राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार तसेच आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा व विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीस तुमसर-मोहाडी विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस: देवचंद ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस: सरिता मदनकर व अन्य हजर होते.