मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील पाळा येथे आपले स्वतःच्या घरात एका 28 वर्षे युवकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 25 डिसेंबरला सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. कमलेश पंढरी कडू वय 28 वर्ष असे या युवकाचे नाव असल्याचे कळते. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे