पुरंदर: कोळविहिरे येथील हातभट्टी पोलिसांनी केली नष्ट: एकावर जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल
Purandhar, Pune | Apr 20, 2024 पुरंदर तालुक्यातील कोळगिरी येथे गावठी दारू बनवणारी हातभट्टी जेजुरी पोलिसांनी १८ एप्रिलला नष्ट केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हातभट्टी चालवणारा राजू राठोड (राहणार धालेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत. अशी माहिती शनिवार २० एप्रिलला देण्यात आली आहे.