दिग्रस तालुक्यातील वाईलिंगी येथे बांधकामाच्या कामावर मजुरीच्या पैशावरून दोघांत वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादातून एका व्यक्तीस लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. या प्रकरणी फिर्यादी आकाश तात्याराव वाझळकर (वय २७) यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी गजानन रमेश कवचट (वय ४०) याने मजुरीच्या पैशाच्या कारणावरून शिवीगाळ करत वाद उकरून काढला व लाकडी काठीने मारहाण करून फिर्यादीस जखमी केले.