पालघर: रक्तचंदन तस्करीवर साखरे परिसरात वनविभागाची कारवाई; रक्तचंदनाचे 200 ओंडके जप्त
रक्तचंदन तस्करीवर वनविभागाने कारवाई केली आहे. दहिसर वनपरिक्षेत्रातील साखरे परिसरातील एका फार्म हाऊसवर वनविभागाने छापा टाकला आणि झडती घेतली असता त्या ठिकाणी थर्माकोल आवरणाच्या आतमध्ये रक्तचंदनाचे ओंडके आढळून आले. वनविभागाने कारवाई करत रक्तचंदनाचे 200 ओंडके जप्त केले आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीं विरोधात दहिसर वनपरिक्षेत्र कार्यालयात वन अधिनियम कलम 41 आणि 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रक्तचंदन तस्करी प्रकरणातील सूत्रधाराचा शोध सुरू आहे.