पातुर: अकोट नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम भगिनीला संधी देणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांचा दावा
Patur, Akola | Nov 10, 2025 आजपासून नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचा आढावा घेण्यात आला. अकोट नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पद ओबीसी महिला आरक्षणासाठी राखीव असल्याने, पक्षाने मुस्लिम भगिनीला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अधिकृत घोषणा पक्षाचे सहसंघटक आमदार संजय खोडके हे आज अमरावतीतून करणार आहेत. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड, तेल्हारा, पातुर, बार्शीटाकळी, मुर्तीजापुर आणि बाळापुर ही नावे सध्या गुलदस्त्यात ठेवली आहेत.