भडगाव येथील पोलीस स्टेशन आवारात अस्ताव्यस्त वाहने लावलेल्या सुमारे 25 ते 30 वाहनधारकांवर आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान कारवाई करण्यात आली, पोलीस स्टेशनला अडथळा निर्माण होईल अशी वाहन येथे लावली जातात, त्यामुळे अशा त्रासदायक ठरणाऱ्या वाहनांवर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली, तरी या पोलिस स्टेशन आवारात अस्थाव्यस्त वाहने लावू नये असे आवाहन देखील यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.