जळगाव: तापी पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंत्याकडून सामाजिक कार्यकर्ते अजय बढे यांना धमकी; संरक्षणासाठी एसपींना मागणी
तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी कार्यालयाच्या आवारात सोमवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिली आहे. त्यामुळे संरक्षण मिळावे यासाठी अजय बढे यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे सायंकाळी ५ वाजता केली आहे