सातारा: साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित बांधवांचा मोर्चा
Satara, Satara | Sep 17, 2025 साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातून दलित बांधवांनी बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात केली. मोर्चा राजपथावरुन गोलबागेला वळसा मारुन पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका, जिल्हाधिकारी कार्यालय असा पोहचला. मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, संदीप कांबळे, अशोक गायकवाड यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.