शहरातील रामनगर मध्ये गुन्हे शोध पथकाने छापेमारी करीत नगीना बाग रोड येथील जनरल स्टोर्स मध्ये काल दि.१२ डिसेंबर ला सायंकाळी ६ वाजता विक्री करिता साठवून ठेवलेला मोनोकाईट फायटर, मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस प्रतिबंधित नायलॉन मांजा किंमत २३ हजार ४०० जप्त करण्यात आला.या कारवाईत जनरल स्टोर्स चालक २५ वर्षीय गौरव हेमराज गोटेफोडे यांच्यावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.