नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी 5 डिसेंबरला रात्री 8 वाजता दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन हद्दीत एका खोलीमध्ये युवक युवती रक्तबंबाळ अवस्थेत आढळले होते. याप्रकरणी पोलिसांना तपास करत जखमी युवतीवर गुन्हा दाखल केला आहे. तीने त्याच्या प्रियकराचा खून करून स्वतःवर वार करत सगळा बनाव केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली आहे.