चंद्रपूर: राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांना कोल्हा करण्याचे भाजपचे प्रयत्न : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांना कोल्हा करण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. बुधवारी अहेरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाही असे छातीठोक पणे सांगणाऱ्या राज ठाकरेंना दिल्लीची वारी करून यावं लागलं असंही वडेट्टीवार म्हणाले.