राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत डहाणू येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष बांधणी, संघटनात्मक बांधण सह विविध विषयांवर यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.