कोरेगाव: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १४ लाख ४० हजारांची फसवणूक;
खडखडवाडीतील ६८ वर्षीय वृद्धाला ऑनलाईन भीती दाखवून पैसे उकळले
कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथील ६८ वर्षीय भानुदास नारायण बाबर यांच्याकडून स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तींनी तब्बल १४ लाख ४० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दि. १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीला व्हॉट्सअॅपवरून कॉल केला.