सातारा: जिल्हा महिला काँग्रेसला मिळाला धडाडीचा चेहरा, सुषमा राजेघोरपडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
Satara, Satara | Oct 18, 2025 जिल्हा महिला काँग्रेस समितीला नवी ऊर्जा मिळाली आहे. सुषमा राजेघोरपडे यांची सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे पक्षात नवसंजीवनी आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. सामाजिक जाण, राजकीय अनुभव आणि संघटन कौशल्य यांचा उत्तम संगम असलेल्या सुषमा राजेघोरपडे यांनी आजवर विविध स्तरांवर कार्य करत जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.