शेगाव: एका बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या ५ जणांना शेगाव शहर पोलिसांनी शिवाजी नगर परिसर येथे पकडले
एका बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या ५ जणांना शेगाव शहर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री २.३० वाजेदरम्यान शिवाजी नगर परिसरात पकडले.व त्याच्या ताब्यातून १६ हजार ८५० रुपयाचा जुगार साहित्य मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे .शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोउपनी कुणाल जाधव यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी नगर परिसरात येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आकाश मधुकर जाधव, शुभम अनील यादव, श्रीकांत एकनाथ आवटे,शेख रशीद शेख बिस्मिल्ला, गणेश मारोती पवार पकडले.