दीपावली निमित्त परंपरानुसार लिंगायत गवळी समाजाच्या वतीने सगर महोत्सव आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान वजीराबाद राधाकृष्ण मंदिर ते हनुमान मंदिर वजीराबाद नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो यादव गवळी, लिंगायत गवळी, श्रीकृष्ण गवळी समाज बांधव सगर उत्सवात सहभागी झाले होते.या कार्यक्रमात उत्कृष्ट पशु प्रदर्शन व पशुसंवर्धन करीता लिंगायत गवळी समाज बांधवा चे यथोचित सत्कार ही करण्यात आला.