वर्धा: नवरात्रीच्या गरबा उत्सवात हिंदू संस्कृती जपावी – विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे आवाहन
Wardha, Wardha | Sep 21, 2025 नवरात्रीच्या काळात संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर गरबा उत्सव साजरा केला जातो. गरबा हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून देवीच्या उपासनेचा, भक्तीचा आणि पारंपरिक मूल्यांचा अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वर्धा यांच्या वतीने आज सायंकाळी ४ वाजता साई मंदिर, वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत गरबा उत्सवाच्या आयोजनासंदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना व नियम जाहीर करण्यात आले.