अकोला: अकोला पोलीसांची धडक मोहिम; विविध ठिकाणी ८७ कारवाया, ९.६४ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त
Akola, Akola | Nov 28, 2025 नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत २७ नोव्हेंबरला एक दिवशीय जिल्ह्यातील विविध भागात धडक मोहीम राबवून अवैध दारूविरोधात ८७ कारवाया केल्या. तब्बल ९,६४,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. नागरिकांच्या सहकार्याने अवैध दारूचा संपूर्ण उच्चाटन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.ही माहिती पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शंकर शेळके यांनी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता