भंडारा: १८ वर्षीय तरुणीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू; भंडारा पोलिसांत मर्ग दाखल
भंडारा जिल्ह्यातील अशोक नगर येथील रहिवासी असलेली १८ वर्षीय कुमारी पुनम पृथ्वीराज वैद्य हिची प्रकृती खालावल्याने तिला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आकस्मिक विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र दिनांक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र उघडकीस आलेलं नाही. या प्रकरणी, डॉक्टरी मेमो वरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. शेंडे हे करीत आहेत.