कर्जत: कर्जत येथे राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आ. थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश
Karjat, Raigad | Sep 29, 2025 राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले आणि निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात आपण एकत्र काम करून शिवसेना आणखी बळकट करू, असा शब्द दिला.