भंडारा: भंडारा सायबर पोलिसांचे 'जागरूकता कवच'!
बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना 'सायबर सुरक्षेचे धडे'
डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भंडारा सायबर पोलिसांनी भंडारा शहरातील बस स्टॉप आणि भंडारा रोड रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान विशेष 'सायबर जनजागृती मोहीम' राबवली. प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींना किंवा कोणत्याही लिंकद्वारे ओटीपी (OTP), सीव्हीव्ही (CVV) किंवा बँक तपशील देऊ नका. कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा लॉटरीच्या मेसेजम