वरोरा ते माढेळी रस्त्यावर जागो जागी खड्डे पडल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सदर मार्गावर वेकोलिची जड वाहतुक मोठया प्रमाणात सुरू असून या ठिकाणी धुळीचा त्रास जाणे येणे करणार्यां नागरिकांना सहन करावा लागत असल्याने आज दि.18 नोव्हेंबर ला 12 वाजता चरूर खटी येथील उपसरपंच विवेक नांदे यांनी गावकर्यांनसह दिड तास वाहतुक रोखली .वरोरा माढेळी मार्गालगत असलेले शेत पिके सुध्दा धुळीने माखली आहे. सदर समस्येचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना गावकऱ्यांनी दिले.