खामगाव: नायदेवी येथे वीज चोरी
एका वीज ग्राहकाविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वीज चोरी शोध मोहिमेअंतर्गत महावितरणच्या खामगाव येथील पथकाने नायदेवी येथे घरी छापा टाकून विद्युत मिटरची तपासणी केली असता मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहका विरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी ५ वाजेदरम्यान गुन्हा नोंदविला आहे.प्रमोद तुकाराम पवार यांच्या घरी भरारी पथकाने छापा टाकून मीटरची तपासणी केली असता मागील १२ महिन्यात २०१२ युनिट व तळजोरी रक्कम एकूण ४८ हजार ६९० रुपयाची विज चोरी केली.