उमरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमरी येथे शिरीष गोरठेकर व कैलास गोरठेकर यांनी राष्ट्रवादीमध्ये केला पक्षप्रवेश
Umri, Nanded | Oct 25, 2025 माजी आ. स्व. बापूसाहेब गोरठेकर यांचे सुपुत्र शिरीष देशमुख गोरठेकर उमरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व कैलास देशमुख गोरठेकर संचालक ना.जि.स.म.बँक यांनी आजरोजी उमरी शहरातील मोंढा परिसरात आयोजित सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11:30 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केले असून यावेळी उमरी धर्माबाद तालुक्यातील गोरठेकर घराण्यावर प्रेम करणारी मय बाप जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.