हिंगोली: वाशिम येथील आधुनिक बांबू शेती या विषयावर एक महत्त्वपूर्ण बांबू परिषद पार पडली आमदार तानाजी मुटकुळेंनी लावली उपस्थिती
वाशिम येथे "शेतकरी, शेती, माणूस आणि पृथ्वी वाचविण्याचा राजमार्ग — आधुनिक बांबू शेती" या विषयावर एक महत्वपूर्ण बांबू परिषद पार पडली. या परिषदेत कृषी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, अधिकारी आणि शेतकरी बांधव सहभागी झाले. यावेळी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ पाशा पटेल यांनी शाश्वत शेती पद्धती, पर्यावरण रक्षण आणि आधुनिक बांबू शेतीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.