जालना: प्रकल्प संचालक सुनील पठारे यांचा मनमानी कारभार; जिल्हा परिषदेत संताप, सीईओ कारवाई करणार का?
Jalna, Jalna | May 7, 2026 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (DRDA) प्रकल्प संचालक सुनील पठारे यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेतील कामकाजाचा बोजवारा उडाला असून, त्यांच्या मुजोर वागणुकीमुळे कंत्राटदार आणि सरपंचांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'मी तुमचा बॉस आहे' अशा आविर्भावात वागणाऱ्या या अधिकाऱ्याने चक्क मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोपवलेला अतिरिक्त पदभारही गांभीर्याने न घेतल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महत्त्वाच्या फाईल्स अडकवून ठेवल्या; विकासाला 'ब्रेक' एप्रिल महिन्