नागपूर ग्रामीण: गॅस ग्राहकांसाठी दिलासा: नागपुरात एजन्सीजवर आता शेड व पिण्याच्या पाण्याची सोय
वाढत्या उष्णतेमुळे गॅस ग्राहकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व गॅस एजन्सींना ग्राहकांसाठी शेड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार आता शहरासह ग्रामीण भागातील गॅस वितरणावर केंद्रांवर या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, गर्दी टाळण्यासाठी वितरणाचे वेळेचे नियोजन करण्यात आले असून, तालुका व परिमंडळ स्तरावरून त्यावर देखरेख ठेवली जात आहे.