भंडारा नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, १ डिसेंबरला, शहरातील राजकारण चांगलेच तापले. भाजपमधील काही बंडखोर उमेदवार आणि पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या २२ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी, भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी जॅकी रावलानी यांच्यासह भाजपच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी तातडीने दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, राजीनामा देणाऱ्या २२ पदाधिकाऱ्यांवर त्यांनी शिवसेनेकड