अमरावती शहरात आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाची भर घालणाऱ्या सुजन सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन आज २७ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी दीड वाजता राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. कॅन्सरसारख्या गंभीर व जीवघेण्या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार, तसेच अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आता एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. हे हॉस्पिटल अमरावती व परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरणार असून, आरोग्य क्षेत्रातील...