जिल्ह्यातील थेरगांव येथे जात असलेल्या दुचाकी स्वारांना ताडाळा कडुन मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने चिचाळा मार्गावरील महाबीज जवळ धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दि.11 डिसेंबर ला दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. मुन्ना पोरते वय 35 वर्षे व अनिल मडावी वय 37 वर्षे रा. थेरगांव असे अपघातात ठार झालेल्या युवकांचे नांव आहे.