जालना: मनसे कामगार नेते आर. आर. पाटोळे यांना महापालिकेकडून नोटीस; शहरात चर्चेला उधाण
Jalna, Jalna | Jun 5, 2026 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार जिल्हाध्यक्ष आर. आर. पाटोळे यांना जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या नोटीसमुळे जालना शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मनसेच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की, महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजाविरोधात आवाज उठवल्यामुळे पाटोळे यांना ही नोटीस देण्यात आली आहे. पाटोळे यांनी यापूर्वीही महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कारभारावर प्रश्नचिन्ह उप