शेगाव: चोरी गेलेल्या तिन्ही गाई दोघांच्या ताब्यात मिळून आल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरुड शिवार येथे घडली
चोरी गेलेल्या तिन्ही गाई दोघांच्या ताब्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान मिळून आल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरुड शिवार येथे उघडकीस आली आहे. निलेश तेजराव वानखेडे वय 36 वर्ष व प्रदिप हिवराळे दोन्ही रा.उमरा लासुरा यांच्या ताब्यात तीन गाई नागरिकांना दिसून आल्या या घटनेची माहिती मिळताच गायमालक व ज्यांच्या गाई चोरी गेल्या त्यांनी घटनास्थळी येऊन गायची पाहणी केली असता सदर गाई गोपाल मनोहर हिंगणे ,गजानन रामेश्वर नाटकर व रतन कोकाटे यांच्या असल्याचे निष्पन्न झाले.