जालना: गोकुळवाडीत हवेत गोळीबार, तरुणाला मारहाण; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Oct 13, 2025 जालना तालुक्यातील गोकुळवाडी येथे एका तरुणाने हवेत गोळीबार करुन एका तरुणाला मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात पाच जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सोमवार दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्राकडून देण्यात आली. जालना तालुक्यातील गोकुळवाडी येथे 30 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी अशोक भानुदास भोसले या फोटोग्राफरला गंभीरित्या मारहाण करून जखमी करण्यात आलं होतं.