कामठी: गादागाव जवळील कन्हान नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळल्याने खळबळ
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गादा गावाजवळून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात 40 ते 45 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या अनोळखी व्यक्तीची ओळख पाठविण्याचे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.