भोकरदन: वालसावंगी येथे वैद्यकीय अधिकारी पदी डॉ.अनुष्का गणेश भुते यांची नियुक्ती, गावकऱ्यांनी केला पुष्पगुच्छ देत सत्कार
आज दिनांक 22 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेले वालसावंगी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी पदी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जालना आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर अनुष्का गणेश भुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या नियुक्ती बद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे, यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित झाले होते.