चारचाकी गाडीतून आलेल्या तिघांनी एका शेतकऱ्याला अज्ञात कारणावरून लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नविन गार (ता.दौंड) येथे सोमवारी (ता. 15) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.