पोंभूर्णा: वाघाने केली रानडुकराची शिकार, नवेगाव मोरे येथील घटना
पोंभूर्णा तालुल्यातील नवेगाव मोरे- परिसरात दि. ५ नोव्हेंबर ला गावाच्या शेतशिवारात वाघाने डुकरावर हल्ला करून त्याची शिकार केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावातील शेतकरी शेतात काम करत असताना त्यांना डुकराचे अवशेष दिसून आले. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. पुढील तपास वन विभाग करीत आहे.