भोकरदन: वालसावंगी परिसरामध्ये पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकऱ्याचा मिरची लागवडीकडे वाढता कल
आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वानसावंगी येथे शेत शिवारात शेतकरी राजा पारंपारिक पिकांना फाटा देत मिरची लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याचे पाहायला मिळाले आहे याप्रसंगी सोयाबीन ,मका ,तूर या पारंपारिक पिकांना योग्य त्यावेळी योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याला लागवड केलेला खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी 2026 च्या खरीप हंगामा पूर्व उन्हाळ्यामध्ये शेकडो हेक्टर मिरची लागवड केल्याचे पाहायला मिळत आहे.