वणी: वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
Wani, Yavatmal | Sep 15, 2025 अतीवृष्टीमुळे वणी उपविभागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात झरी व वणी तालुक्यात तर या महिन्यात वणी व मारेगाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज तहसिल कार्यालयात धडक दिली