गंगापूर: गंगापुर -अहिल्यानगर रोडवरील जुना कायगाव गोदावरी नदीपात्रात तीस वर्षे तरुणाचा तरंगत होता मृतदेह.
आज गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर अहिल्यानगर रोडवरील जुना कायगाव येथे गोदावरी नदीपात्रात एका अंदाजे २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. मृतदेह नदीत तरंगत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ याची माहिती रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांना देण्यात आली. माहिती मिळताच वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर घटनास्थळी लोकानी मोठी गर्दी केली होती.