पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पंचायत समिती कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वर्धा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच तसेच तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते पंचायत समिती अंतर्गत विविध स्वयं सहायता गटांना कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले. महिला बचतगटांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागा