नागपूर ग्रामीण: हुडकेश्वरमध्ये घरफोडी: १.३१ लाखांचा ऐवज लंपास
हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सरस्वती नगर येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. यात ९५ हजार रोख आणि सोन्याच्या साखळीचा समावेश आहे. तक्रारदार महिला आपल्या आईसोबत पुण्याला गेल्या असताना ही घटना घडली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.