अकोट: ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर येथे पोलीस दीदी पोलीस काका उपक्रम पार पडला
Akot, Akola | Oct 14, 2025 अकोट ग्रामीण पोलिस हद्दीतील शिवपुर येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा येथे पोलिस दिदी, पोलिस काका मीटिंग घेण्यात आली,यात एकूण 57 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.या मिटिंगमधे ऑपरेशन उडान पोलिस दिदी,पोलिस काका उपक्रमाचा उद्देश कामगार बालक,जबरदस्तीने भीक मागणी,पोक्सो कायदा,अल्पवयीन मुली, मुले घरातून पळून जाणे बालकांचे लैंगिक शोषण बालकांचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे फेसबुक, इंस्टाग्राम विविध सोशल मीडिया द्वारे होणारीफसवणूक आदीबाबत जनजागृती करण्यात आले.