जालना: पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Jalna, Jalna | May 19, 2026 जालना : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून शेतीची कामेही प्रभावित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या शेतीच्या विविध कामांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. मात्र डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असून अनेक ठिकाणी शेतीची कामे खोळंबत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी