अकोला: जिल्हाधिकाऱ्यांची जीएमसीला अचानक भेट — अन्नपुरवठ्याच्या तक्रारींची चौकशी
Akola, Akola | Nov 12, 2025 अकोला, दि. १२ : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दिनांक 12 नोव्हेंबर रोजी (जीएमसी) अचानक भेट देत गायनिक विभाग, अपघात कक्ष आणि मेसची पाहणी केली. रुग्णालयातील आरोग्यसेवा, स्वच्छता आणि भोजनाच्या गुणवत्तेचा आढावा घेत त्यांनी अन्नपुरवठ्याबाबतच्या तक्रारींची चौकशी केली. संबंधित अधिकाऱ्यांना रुग्णांना पौष्टिक व स्वच्छ अन्न द्यावे आणि तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद द्यावा, असे आदेश दिले. तसेच नवीन इमारतीच्या बांधकामाची कार्यवाही गतीमान करण्याच्या सूचना दिल्य