कळमनूरी: ट्रॅक्टरचे टायर फुटून अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक जण जखमी.कांडली फाटा शिवारातील घटना
हिंगोली नांदेड या र महामार्गावर तालुक्यातील कांडली फाटा शिवारात आज दि .18 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टरचे टायर फुटून पायी जाणाऱ्या दोघांना धडक देऊन ट्रॅक्टर पलटी झाले या अपघातात कांडली येथील विश्वनाथ संजयराव पतंगे वय 17 वर्षे आणि कुणाल रामदास पानपटे वय 18 वर्षे हे दोघेजण ट्रॅक्टर खाली दाबून गंभीर जखमी झाले,या दोघांना तात्काळ आ. बाळापूरतील ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल केले असता डॉक्टरांनी विश्वनाथ पतंगे यास मृत्त घोषित केले,कुणाल पाटपट्टे जखमी झाल्याने त्यास नांदेडला हलविले