बीड जिल्हा परिषदेच्या ६१ प्रभागांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाची सोडत योग्य निकषानुसार न झाल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आरक्षणाची टक्केवारी लक्षात घेता सर्व तालुक्यांमध्ये समान वाटप न झाल्याने अनुसूचित वर्गावर अन्याय झाल्याचे त्यांनी म्हटले असून, ८ दिवसांत बदल न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.