आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. उपराजधानी नागपुरात या अर्थसंकल्पाचे विविध व्यापारी संघटना आणि व्यावसायिक संस्थांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर नागपुरातील व्यापारी वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत आशा व्यक्त केली आहे, तर काहींनी "ना काही मिळाले, तर ना काही गमावले" अशी सावध भूमिका घेतली आहे.