वाळू वाहतूक करणारा हायवा क्र.MH-14-HG-7291 च्या चालकाने भरधाव वेगाने हायवा चालवत कुंडलवाडी शहरातील धर्माबाद जाणाऱ्या रोडवरील साठे नगर परिसरात वृद्ध व्यक्ती असणाऱ्या गंगाधर भोसले यांना जोराची धडक दिली होती, ह्या धडकेत भोसले यांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली असून दोन्ही पायांना मार लागला असून तातडीने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे, ही घटना आजरोजी सकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान घडली असल्याचे समजते आहे.दरम्यान धडक देत हायवा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता.